आरोग्यदायी ड्रॅगन फळ खाण्याचे फायदे (Dragon Fruit Benefits In Marathi)

अँटिऑक्सिडंटचा भरपूर साठा (Rich In Antioxidants) ड्रॅगन फ्रुटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटचा साठा असतो. शरीरात अँटीऑक्सिडंट घटकांचा भरपूर साठा असेल तर तुम्हाला अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. ड्रॅगन फ्रुटमध्ये बेटा कॅरेटीन, लायकोपिनी आणि बेटालिनी असते. ज्यामुळे क्रोनिक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. रॅडिकलमुळे होणारे शरीराचे नुकसान टाळण्यासाठी अँटिऑक्सिडंटनी युक्त असे ड्रॅगन फ्रुट खाणे महत्वाचे असते. मधुमेहींसाठी चांगले (Lower Blood Sugar Level) अनेक आजारांमध्ये अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून ड्रॅगन फुट खाण्याचा सल्ला दिला जातो. ड्रॅगळ फळात ज्या काळ्या रंगाच्या बिया असतात ज्या मधुमेंहीसाठी फारच फायद्याच्या असतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते. ज्यांना टाईप दोन प्रकाराचा डाएबिटीझ असतो. अशांसाठी तर हा अगदी उत्तम असा पर्याय आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी याचा वापर नक्कीच करायला हवा. प्रतिकारशक्ती वाढवते (Strengthen Immune System) आरोग्य चांगले आणि निरोगी हवे असेल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे देखणे गरजे...